कवीवर्य संघप्रिय रामजी कदम यांना ‘राज्यस्तरीय सम्यक कला भूषण पुरस्कार’ प्रदान
नवीमुंबई (मंगेश जाधव)
दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नुकतेच याठिकाणी सम्यक कोकण कला मंच आयोजित २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रौप्य महोत्सवी ‘राज्यस्तरीय सम्यक कला भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुहागर तालुक्यातील पेवे गावचे सुपुत्र कवीवर्य संघप्रिय रामजी कदम यांना ‘राज्यस्तरीय सम्यक कला भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांना प्रोत्साहनपर शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कदम कुटुंबा समवेत बौद्धजन विकास मंडळ, मौजे पेवे मुंबई शाखेचे विद्यमान कार्याध्यक्ष, हेमंत भेकरे व कोषाध्यक्ष, रविंद्र कदम तसेच बौद्धजन सहकारी संघ, पेवे विभाग नंबर २ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.















