गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प
बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आणि जि. प.सदस्य विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ०६ जून रोजी भव्य वृक्षारोपण अभियान
गुहागर : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच अस गोली जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर विधानसभा क्षेत्रात शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात १० झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला असून तब्बल २५०० झाडांची लागवड केली जाणार आहे.
या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत “वृक्ष लावा दारोदारी… समृद्धी येईल घरोघरी” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेत प्रत्येक गावातील शाखा प्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, पक्षातील लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गुहागर विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या या भव्य वृक्षारोपण मोहिमेमुळे पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
















