पावसाळी क्रीडा स्पर्धेत कोळवली हायस्कूलची आर्या पाष्टे उंच उडीत व्दितीय

पावसाळी क्रीडा स्पर्धेत कोळवली हायस्कूलची आर्या पाष्टे उंच उडीत व्दितीय..!

आबलोली (संदेश कदम) ….

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीच्या तालुकास्तरीय पावसाळी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच देवघर हायस्कूलच्या भव्य क्रीडा मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील कोळवली हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या उंच उडी या क्रीडा स्पर्धेत कु. आर्या उदय पाष्टे हीने जबरदस्त कामगिरी करत व क्रीडा कौशल्य आणि दमदार चलाखी दाखवत व्दितीय क्रमांक पटकावला याबद्दल ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.शांताराम वाघे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रामचंद्र मोरे,सचिव श्री.नारायण मोहिते, सहसचिव श्री. शंकर जोशी,संस्थेचे सदस्य श्री.वासुदेव डिंगणकर, श्री.नंदकिशोर सुर्वे,श्री.दामोदर डिंगणकर,श्री.बाबाजी मुंडेकर ,श्री.सदानंद जोशी,श्री. रवींद्र गावडे.श्री.संतोष डिंगणकर तसेच श्री.अमोल वाघे,श्री.संतोष आंब्रे,श्री. वामन जाधव,श्री.एस.आर.मुलाणी,

यांनी अभिनंदन केले.तसेच

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री.बाळासाहेब लवटे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री.विकास कदम यांचेही यावेळी कौतुक आणि अभिनंदन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम. वाय.पाटील व त्यांच्या सहकारी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही कु. सहेली संदिप वाघे हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें