लांजा-साटवली रस्त्याची दुरवस्था: कोंडये सरपंच आक्रमक, १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा लांजा (प्रतिनिधी: जितेंद्र चव्हाण): लांजा तालुक्यातील लांजा-साटवली रस्त्यावरील कोंडये गावातून साटवलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गटार लाईन नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोंडये ग्रामपंचायतचे सरपंच मनोज चंदुरकर यांनी या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी लांजा सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन लांजा-साटवली-इसवली रस्ता रा.मा.क्र.१६८ च्या दुरवस्थेबाबत माहिती दिली होती. कोंडये ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटार अपूर्ण असल्याने आणि साईट व गटारांवर अतिक्रमण झाल्यामुळे होणाऱ्या अपघातांतून मुक्ती मिळावी, अशी मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली होती. मात्र, या निवेदनानंतरही लांजा सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. यामुळे संतप्त झालेल्या सरपंच मनोज चंदुरकर