आमदार भास्करशेठ जाधव यांच्या उपस्थितीत लोटेत पार पडली भव्य बैलगाडी शर्यत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके
गुहागर विधानसभा क्षेत्रातील लोटे विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना आमदार केसरी भव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा थरार स्वत: आमदार भास्करशेठ जाधव यांनी अनुभवला. विजेत्यांना त्यांच्या हस्ते तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळाराम खेडेकर, तालुकाप्रमुख दत्ता भिलारे आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
खेड तालुका प्रमुख अंकुश काते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम नियोजन करून या स्पर्धेचे आयोजन केले. यामुळे स्थानिक जनतेला पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा रोमांचक अनुभव घेता आला.
हॅशटॅग्स:
#भास्करजाधव #शिवसेना #बैलगाडा_शर्यत #गुहागर #खेड #RatnagiriNews #लोटे
फोटो