चिपळूणमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; गैरप्रकार झाल्यास पोलिस कारवाईचा इशारा – पालकमंत्री उदय सामंत
सात महिन्यांत ५० हजारांहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी; महिलांसाठी मोफत कर्करोग प्रतिबंधक इंजेक्शन, शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना अमेरिकेत शिक्षणाची संधी
बातमी
चिपळूण तालुक्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा साहित्य आणि गृहोपयोगी वस्तूंचं वाटप राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं.
या वाटप प्रक्रियेत कुणी गैरप्रकार करत असल्याची तक्रार आल्यास चौकशी करून संबंधितांवर पोलीस कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मा. ना. सामंत यांनी यावेळी दिला.
रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे, जिथं अवघ्या सात महिन्यांत बांधकाम कामगारांची नोंदणी १० हजारांवरून ५० हजारांहून अधिक करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना “लाडकी बहीण” योजना कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांची विज्ञान शाखेतील हुशार मुलं अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणार, असा देशातला पहिला उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात सुरु झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
महिलांमध्ये भविष्यात कर्करोग होऊ नये, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ लाख महिलांना मोफत कर्करोग प्रतिबंधक इंजेक्शन पुढील महिन्यापासून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
नवीन पिढी अंमली पदार्थांपासून दूर राहावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व स्वयंसेवी यंत्रणांनी एकत्रित काम करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
या कार्यक्रमावेळी प्रवीण लोकरे (तहसीलदार), संदेश आयरे (उपायुक्त कामगार), विशाल भोसले (मुख्याधिकारी, चिपळूण नगरपरिषद), सचिन कदम (जिल्हाप्रमुख, शिवसेना), प्रकाश देशपांडे (ज्येष्ठ साहित्यिक), उमेश सपकाळ (शहरप्रमुख, शिवसेना), मिलिंद कापडी (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), निहार कोवळे (तालुकाप्रमुख, शिवसेना), अशोक शिंदे (अर्जुन पुरस्कार विजेते), संदीप सावंत (माजी तालुकाप्रमुख, शिवसेना), बाबू म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#उदयसामंत #बांधकामकामगार #रत्नागिरी #चिपळूण #शासकीययोजना #लाडकीबहीण #कर्करोगप्रतिबंध #ShivSena #NCP #GovernmentInitiative #ConstructionWorkers
फोटो