तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर

येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते शरफुद्दीन फकूमिया काझी 65 यांचे मंगळवारी दुपारी आकस्मिक निधन झाले. एका छोट्याशा अपघाताचे निमित्त ठरून त्यांचे अचानक जाणे ही तालुक्यासह संपूर्ण परिसरासाठी अत्यंत धक्कादायक घटना ठरली आहे.

मंगळवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ते आपल्या चारचाकी वाहनाने परिसरातील चव्हाणवाडी येथे जात असताना त्यांच्या वाहनाला एक किरकोळ अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना साखर कोंबे येथील एका खाजगी डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली. प्राथमिक तपासणीत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले नव्हते. मात्र काळजी म्हणून त्यांना पुढील तपासणीसाठी रत्नागिरी येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

रत्नागिरी येथे पोहोचल्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे दळे, जैतापूर परिसरासह संपूर्ण राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

शरफुद्दीन काझी हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजापूर तालुका काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती. तसेच जैतापूर जमात मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले.

याशिवाय त्यांनी जैतापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदही अनेक वर्षे भूषविले होते. दळे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ते अनेक वर्षे सदस्य म्हणून कार्यरत होते. जैतापूर सागरी विभागात काँग्रेस पक्षाचा एक विश्वासू आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. ते श्रमिक पतपेढी साखरचे संचालक देखील होते.

सामाजिक व राजकीय कार्यासोबतच ते परिसरात चिरेखन व्यावसायिक, तसेच स्वामिल व्यावसायिक व आंबा बागायतदार म्हणूनही परिचित होते. त्यांच्या सामाजिक जाणिवा, सर्वसामान्यांशी असलेली आपुलकी आणि संघटनात्मक कौशल्य यामुळे ते सर्व स्तरातून आदराने पाहिले जात होते.

त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून, उद्या जैतापूर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.

शरफुद्दीन काझी यांच्या निधनाने एक अनुभवी राजकीय कार्यकर्ता, समाजसेवक आणि लोकसंपर्क असलेले नेतृत्व हरपल्याची.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात