साटवलीत मृत व्यक्तीची हेळसांड; आरोग्य विभागावर संताप.
गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णाचा मृत्यू; मृतदेह दोन तास वरंड्यातच ठेवला गेला, ग्रामस्थांत संताप
लांजा ( जितेंद्र चव्हाण प्रतिनिधि ) तालुक्यातील साटवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे 3 मे 2025 रोजी एक धक्कादायक प्रकार घडला. सडवली येथील विजय केरू भोवड (वय 40) यांना गंभीर अवस्थेत या केंद्रात उपचारासाठी आणले गेले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे, मृत्यू झाल्यानंतर तब्बल दोन तास त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या वरंड्यात तसाच ठेवण्यात आला.
भोवड यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर दुर्लक्षाचा आरोप केला आहे. सायंकाळी पाच वाजता मृतदेह आणण्यात आला, पण ७.२४ वाजेपर्यंत तो तसाच वरंड्यात राहिला. विशेष बाब म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे स्वतःची ॲम्बुलन्स असूनही खाजगी ‘जिजाऊ’ संस्थेच्या ॲम्बुलन्सद्वारे मृतदेह लांजा येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
या घटनेनंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी गंभीर दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधितांवर वरिष्ठ स्तरावरून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस पाटलांची सहकार्य करून संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना विचारलं पाहिजे होत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी केवळ दोन कर्मचारी — डॉक्टर आणि नर्स — उपस्थित होते. पोलिस पाटलांनी ग्रामस्थांना बोलावून मृतदेह आत नेण्यासाठी मदत करायला हवी होती, पण तसे न झाल्यामुळे त्यांच्यावरही चौकशीची मागणी होत आहे.
या प्रकारामुळे साटवली पंचक्रोशीतून आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
हॅशटॅग्स:
#साटवली #लांजा #प्राथमिकआरोग्यकेंद्र #मृत्यूप्रकरण #आरोग्ययंत्रणा #पोलिसपाटील #JitendraChavanReporting #RatnagiriNews
फोटो