जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा एस व्ही जे सी टी क्रीडा संकुलात जल्लोषात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा एस व्ही जे सी टी क्रीडा संकुलात जल्लोषात संपन्न

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय, अंतर्गत

चिपळूण ~(प्रतिनिधी. )जिल्हा फुटबॉल संघटना यांचे तांत्रिक सहकार्याने एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल चिपळूण येथे जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे दिनांक १० ते १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलींमध्ये एकूण २७ संघ असे एकूण ४८६ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिनेश पुजारी, एस व्ही जे सी टी क्रीडा संकुलचे क्रीडा संचालक श्री श्रीकांत पराडकर, जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रसाद परांजपे, क्रीडा शिक्षक अजित दवडे, कुणाल चव्हाण, समिर यादव, आशिष कानापडे, आदि मान्यवर उपस्थित होते.श्री दिनेश पुजारी यांचे स्वागत क्रीडा शिक्षक श्री कुणाल चव्हाण यांनी केले तर श्री श्रीकांत पराडकर यांचे स्वागत क्रीडा शिक्षक श्री अजित दवडे तर श्री प्रसाद परांजपे यांचे स्वागत श्री आशीष कानापडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सचिन मांडवकर क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांनी केले

स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे :-

१४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात चुरशीने खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यांमध्ये एस. पी. एम इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण संघाने रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर सेंट थॉमस रत्नागिरी संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.

१४ वर्षाखालील मुलींमध्ये सेंट थॉमस रत्नागिरी संघाने कै. सौ. मीनाताई टाकरे माध्यमिक विद्यालय, संगमेश्वर संघाविरुद्ध दमदार खेळ करून अंतिम सामना जिंकला. तसेच एस. पी. एम इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

१७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटामध्ये एस. पी. एम इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण व रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड यांच्यामधील झालेल्या अंतिम सामन्यात एस. पी. एम इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण या संघाने चमकदार कामगिरी करीत अंतिम विजेते पदकावर नाव कोरले. तसेच सेंट थॉमस रत्नागिरी संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात एसव्हीजेसीटी इंग्लिश मिडियम स्कूल संघाने सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट रत्नागिरी संघाविरुद्ध रोमहर्षक खेळ करून विजेतेपद पटकाविले आणि पी. एस. बने इंटरनॅशनल, संगमेश्वर संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

१९ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी आणि डी. बी. जे महाविद्यालय चिपळूण यांमध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या संघाने विजेतेपद पटकावले. तसेच कै. प्र. ग. कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर, खेड संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

१९ वर्षाखालील मुलींच्या गटात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी संघ सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपदाचा मानकरी संघ ठरला तर उपविजेतेपद ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड संघाने मिळवले. तसेच तृतीय स्थान गोविंदराव निकम माध्य व उच्च माध्य विद्यालय, सावर्डे संघाने पटकाविले.

मा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे यांनी विजयी संघाना विभागीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा