🌟 लांजा तालुका उपाध्यक्षपदी आनंद सयाजी कांबळे यांची निवड
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची घोषणा
लांजा प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण) :
लांजा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच गव्हाणे/कोलधे येथील रहिवासी आनंद सयाजी कांबळे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या लांजा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या शिफारसीनंतर ही निवड अधिकृत करण्यात आली.
संघटनेच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, हे पद मानद स्वरूपाचे असून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय संविधान, भारतीय कायदे आणि फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या जनजागृतीसाठी प्रयत्नशील राहून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये या कायद्याचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवडीस संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीसह अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
📸 फोटो
🔖 हॅशटॅग :
#लांजा #माहितीअधिकार #आनंदकांबळे #RTI #RatnagiriVartahar #सामाजिककार्य
















