???? कुणबी विकास सहकारी पतसंस्थेला “पतसंस्था भूषण पुरस्कार 2025” प्रथम क्रमांकाने प्रदान!
???? कोकण विभागातील ५० ते १०० कोटी व्यवसाय गटात लांजाच्या पतसंस्थेचा झेंडा उंचावला
लांजा | प्रतिनिधी – संदीप शेमणकर
कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ, अलिबाग आणि विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025” चे आयोजन अलिबाग येथे करण्यात आले. यामध्ये कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, लांजा यांनी कोकण विभागातील ५० कोटी ते १०० कोटी व्यवसाय गटात प्रथम क्रमांकाचे “पतसंस्था भूषण पुरस्कार 2025” पटकावून गौरव प्राप्त केला आहे.
हा पुरस्कार संघाचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांच्या हस्ते एका भव्य सहकार परिषदेमध्ये संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक नंदकुमार आंबेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे यांना प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, स्थानिक कमिटी सदस्य, सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.