???? साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 ऍम्ब्युलन्सवर तातडीने डॉक्टर नेमावेत – जया माने यांची मागणी.
????️ 108 ऍम्ब्युलन्स डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडे अधिकृत निवेदन.
साखरपा (भरत माने, वार्ताहर) – साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध असलेली 108 आपत्कालीन ऍम्ब्युलन्स डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे मागील काही दिवसांपासून बंद स्थितीत आहे. परिणामी संपूर्ण परिसरातील रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी ठाम मागणी माजी पंचायत समिती सभापती जया माने यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी 108 ऍम्ब्युलन्सचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर (DM) यांच्याकडे तात्काळ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची अधिकृत मागणी केली आहे.
साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात अनेक गावांचा समावेश आहे. येथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असून गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवावे लागते. विशेषतः पावसाळ्यात सर्पदंश, हृदयविकाराचा झटका, तसेच घाट मार्गावर अपघात अशा घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे 108 सेवेसाठी डॉक्टरांची उपस्थिती अत्यावश्यक आहे.
जया माने यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून साखरपा व परिसरातील नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित विभागाने लवकरात लवकर डॉक्टरची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
???? #साखरपा #Ratnagiri #108Ambulance #HealthServices #DoctorAvailability #EmergencyServices #PHC #जया_माने #SakharpaNews #RuralHea