दिशा महाराष्ट्राची” या युट्युब चॅनलच्या वतीने सानपाडा येथे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन आणि सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिशा महाराष्ट्राची” या युट्युब चॅनलच्या वतीने सानपाडा येथे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन आणि सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली(संदेश कदम)
“दिशा महाराष्ट्राच”‘ या युट्युब चॅनलच्या वतीने रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, सानपडा, नवी मुंबई येथे प्रथमच राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध स्तरातील मान्यवरांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत जगताप तसेच कवी संमेलन अध्यक्ष म्हणुन कोकणातील सुप्रसिद्ध साहित्यिक इक्बाल शर्फ मुकादम यांच्या प्रमुख उपस्थितीत होते प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. विशाल माने, संगीता जुमडे, ऍड. पूजा कांबळे, साहित्यिक नरेंद्र पवार, राजेंद्र शेलार तसेच गौतम नेवरेकर यांची उपस्थिती होती.मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करून छ. शिवाजी महाराज, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर कवी संमेलन सुरु होण्यापूर्वी दिशा महाराष्ट्राची या युट्युब आणि वेब पोर्टलचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना करून प्रमुख पाहुण्यांचे शाल, पुष्पगुछ तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
कवी संमेलनाला महाराष्ट्रातून ऐकून ३० कवी सहभागी झाले होते. त्यांनी सुंदर अशा वेगवेगळ्या विषयावर कविता सादर केल्या. त्यांना पेक्षकांनी अपेक्षित साथ देखील दिली. कवी संमेलन अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित साहित्यिकांना अनमोल असे मार्गदर्शन केले आणि लिखाणास शुभेच्छा दिल्या. सन्मान सोहळ्यात ऐकून ३७ मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाजात निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या तीन सामाजिक संस्थांचा देखीलयावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये “आम्ही कोकणकर” या संस्थेस राज्यस्तरीय आदर्श कोकणी युवा संघटना पुरस्कार २०२५, मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान यांना “राज्यस्तरीय आदर्श युवा संघटना पुरस्कार २०२५” तसेच संगमरत्न फाउंडेशन यांना “राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना पुरस्कार २०२५ “या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन युवा साहित्यिक प्रथमेश जाधव तसेच चंद्रसेन जाधव यांनी तर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीतेज नेवरेकर व सपना नेवरेकर यांनी केले. शेवटी संपादक तुषार नेवरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानून भविष्यकालीन उपक्रमांची माहिती दिली आणि कार्यक्रमाची सांगता केली.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला