राजापूरमध्ये सहकारी बँकेत महाघोटाळा! — सभासदांचे संतापजनक प्रश्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🚨 राजापूरमध्ये सहकारी बँकेत महाघोटाळा! — सभासदांचे संतापजनक प्रश्न

शाखाधिकारीवर कारवाई; पण संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी कोणाला वाचवत आहेत का?

राजापूर (प्रतिनिधी : पुरुषोत्तम खांबल) | ऐतिहासिक राजापूर शहरातील शंभरी पार केलेल्या आणि सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या एका प्रतिथयश बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे.

सदर घोटाळ्यात संबंधित शाखाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, हा घोटाळा फक्त शाखाधिकारी यांच्या एकट्याच्या गैरव्यवहारामुळे झाला, असे वरिष्ठ अधिकारी व संचालक मंडळाचे म्हणणे आहे.

पण सभासद मात्र या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, “अशा प्रकारचे महाघोटाळे एकट्याने होत नाहीत; ते संस्थेच्या नावाप्रमाणेच सहकार्याने होतात. वरिष्ठ अधिकारी वारंवार शाखाधिकारीलाच जबाबदार धरत आहेत म्हणजे कुणाला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना?” असा सवाल अनेक सभासदांनी केला.

सभासदांचे आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे, कर्ज वाटप एकट्यानेच झाले असले तरी ऑडिटमध्ये हा घोटाळा कसा उघड झाला नाही? बँकेचे लोन विभाग, रिकव्हरी ऑफिसर, वरिष्ठ अधिकारी आणि संचालक मंडळ यांची भूमिका नेमकी काय असते? या सगळ्याबाबत सभासद अजूनही अनभिज्ञ आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र ही समिती खरोखरच स्वतंत्रपणे आणि दबावाला बळी न पडता काम करेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 


👉 या घोटाळ्याचे पुढील तपशील व नवे खुलासे “रत्नागिरी वार्ताहर”च्या पुढील अंकात…

 

हॅशटॅग्स :#RajapurBankScam #SahakariBank #घोटाळा #RatnagiriNews #BankFraud #CooperativeBank

फोटो

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...