ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट) या संस्थेच्या उपक्रमांतर्गत स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र, परळ यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा परळ येथील भावसार हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मुंबई व परिसरातील ७५ ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धेच्या सांगता समारंभात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्व. मधुकर शंकर लाड स्मृती चषकाचे प्रथम पारितोषिक श्री. अशोक अंबुर्ले यांनी पटकावले. स्व. शा. कांतिलालजी मानमलजी साकरिया स्मृती चषकाचे द्वितीय पारितोषिक श्री. आनंद गोविंद कदम यांना मिळाले. स्व. रमेश रामचंद्र खुळे स्मृती चषकाचे तृतीय पारितोषिक श्रीमती लीला देविदास डांगी (वय ८६ वर्षे) यांनी जिंकून उपस्थितांची विशेष दाद मिळवली. स्व. प्रतिभा प्रभाकर कोलगे स्मृती चषकाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रिया बेर्डे, तर स्व. विष्णू धोंडू शिंदे स्मृती चषकाचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक दास यांना प्रदान करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ व नामवंत कलाकारांनी केले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ गायिका पुष्पाताई पागधरे यांनी भावगीत व चित्रपट संगीताच्या दृष्टीने रसिक आणि स्पर्धकांना प्रेरणादायी निकष दिले. संगीत विशारद, संवादिनी वादक आणि अनुभवी शिक्षक प्रविण देशपांडे यांनी तांत्रिक अचूकता व लयबद्धतेवर भर दिला. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सिद्धहस्त गायिका व संगीत शिक्षिका कल्पनाताई कोठारे यांनी गायनातील भाव, सूर आणि सादरीकरणाच्या सूक्ष्म बाबी अधोरेखित केल्या.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती दिलीपभाई जैन उपस्थित होते. फेस्कॉम मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोटे व सल्लागार शरद डिचोलकर यांनी मार्गदर्शन केले. CSSC, RRTC मुंबईच्या प्रकल्प समन्वयक निलिमा येतकर, लेखापरिक्षक श्रीकांत कुलकर्णी, अ‍ॅड. अशोक सुत्रावे, किशोर आंबेकर, राजेंद्र फुटाणकर, राजू ढवळे आणि विजय औंधे यांनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी संयत आणि प्रभावी शैलीत केले. तर आभारप्रदर्शन स्वामी संस्थेचे अध्यक्ष सुरेश लाड यांनी केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुरेश लाड, कार्याध्यक्ष मोहन कटारे, रचना खुळे, रश्मी नाईक, ममता खेडेकर, विमल माळोदे, प्रतिभा सावंत, गीता नाडकर्णी, सुमंगल गुरव, कांतिलाल परमार, शैलेश तुम्मा, राजाभाऊ कदम, उल्हास हरमळकर, गोविंद राणे, अनिल तावडे, वैशाली शिंदे, प्रतिभा सपकाळे, नम्रता पडवळ कार्तिक बैकर, शिवाजी गावकर आणि संतोष गोलपकर यांनी विशेष सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि सामाजिक सहभाग वाढावा, या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा उपस्थितांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात