🚜 ग्रामीण रस्त्यांचे अभिलेख अद्यावत; साटवलीत शिवार फेरीद्वारे जनजागृती
ग्राम महसूल अधिकारी अजित पाटील यांचे नागरिकांना आवाहन
लांजा (प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण):
राज्यात ग्रामीण रस्ते, पायवाटा, गाडीमार्ग, पानंद रस्ते यांचे अभिलेख अद्यावत करून त्यांना विशिष्ट क्रमांक देणे, तसेच अतिक्रमण हटवणे या कार्यक्रमाला गती मिळाली आहे. शासनाने नवीन GR काढून हा उपक्रम प्रबळपणे राबवण्याचे ठरवले असून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ग्रामस्तरीय शिवार फेरी आयोजित करण्यात येत आहे.
लांजा तालुक्यातील साटवली परिसरात ग्राम महसूल अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार फेरी घेण्यात आली. दिनांक ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान शेतकऱ्यांना या योजनेबाबत माहिती देण्यात आली. गावनिहाय प्राथमिक रस्ता यादी तयार करून ती ग्रामसभेत ठेवली जाणार असून ठरावानंतर तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात येईल.
अतिक्रमण आढळल्यास त्यावर कारवाई होईल आणि भूमिअभिलेख विभागामार्फत सीमांकन करून सार्वजनिक रस्त्यांची नोंद केली जाईल.
ग्राम महसूल अधिकारी पाटील यांनी नागरिकांना “रस्त्यांवरील अडथळे दूर होतील, अडचणीसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा” असे आवाहन केले.
📌 या उपक्रमामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले आहे.
साटवली, पनोरे, रूण, सडवली, इसवली या गावात काढण्यात आली शिवार फेरी.
—
🟢 हॅशटॅग्स :
#लांजा #साटवली #ग्रामीणरस्ते #शिवारफेरी #जनजागृती #रत्नागिरीवार्ताहर
—
📸 फोटो















