अमेरिकेचा 50 टक्के टॅरिफ बॉम्ब!!कशा कशावर होणार परिणाम??आता देवाक काळजी!!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 अमेरिकेचा 50 टक्के टॅरिफ बॉम्ब!!कशा कशावर होणार परिणाम??आता देवाक काळजी!!

मुंबई : हिंदुस्थानी आयातीवर अमेरिकेने लादलेला 50 टक्के टॅरिफ बुधवारपासून (27 ऑगस्ट) लागू होणार आहे. कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत अनेक वस्तूंवर याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानी उद्योग वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या टॅक्स टेररिझमला मोदी सरकारने कुठलेही ठोस प्रत्युत्तर न दिल्याने आता देवावरच विसंबून राहण्याची वेळ निर्यातदारांवर आली आहे.

अमेरिका ही हिंदुस्थानी निर्यातदारांसाठी मोठी बाजारपेठ आहे. हिंदुस्थानातून निर्यात होणाऱया एकूण उत्पादनांपैकी 20 टक्के निर्यात एकटय़ा अमेरिकेत होते. त्यामुळे अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा मोठा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. व्हिएतनाम, बांगलादेश व मेक्सिकोच्या तुलनेत आपली उत्पादने अमेरिकेत महाग होणार आहेत.

*दिल्लीत आज उच्चस्तरीय बैठक*

टॅरिफच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर 26 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. हिंदुस्थानी निर्यातदारांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेऊन त्यावरील उपायांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

*कितीही दबाव आला तरी मार्ग काढू – मोदी*

सर्वच देश सध्या आर्थिक स्वार्थाचे राजकारण करत आहेत. हिंदुस्थानवरही आर्थिक दबाव टाकला जात आहे, पण कितीही दबाव आला तरी आम्ही डगमगणार नाही. त्यातून मार्ग काढू. देशाची ताकद वाढवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे स्पष्ट केले. छोटे उद्योजक, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करू, असे ते म्हणाले.

* कापड आणि ड्रेसेस – हिंदुस्थानकडे येणाऱ्या ऑर्डर्स आशियातील अन्य देशांकडे जाणार.

* हिरे आणि दागिने – आर्थिक वर्ष 2024 मध्ये हिंदुस्थानने 9.2 अब्ज डॉलर्सचे हिरे व दागदागिन्यांची निर्यात केली. टॅरिफच्या घोषणेनंतर ही निर्यात बंद झाली आहे. परिणामी या उद्योगातील रोजगारावर परिणाम होत आहे.

* ऑटो पार्ट्स, फार्मा व इलेक्ट्रॉनिक्स – टॅरिफमुळे किमती वाढल्याने या उद्योगातील कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम.

* सीफूड्स – मागील आर्थिक वर्षात हिंदुस्थानने 86.5 अब्ज डॉलर्स किमतीची कोळंबी निर्यात केली होती. हा आकडा एकूण निर्यातीच्या 20 टक्के होता. टॅरिफ लागू झाल्यानंतर त्यात घट होण्याची भीती.

* ग्राहकोपयोगी वस्तू, चामडे – विश्लेषकांच्या माहितीनुसार, टॅरिफचे नवे दर दीर्घकाळ सुरू राहिल्यास अमेरिकेच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या अभियांत्रिकी वस्तू, चामडे आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांना फटका बसणार आहे.
*खरी माहिती खऱ्या बातम्या यासाठी जॉइन करा संजय वैशंपायन उवाच*
चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029Vb45DVm4o7qERuwMnm0n

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात