विवाह संस्थेवर लग्न जुळवणे पडले महागात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟪 विवाह संस्थेवर लग्न जुळवणे पडले महागात

संगमेश्वर नजीक कळंबस्तेतील तरुणाला महिलेने घातला तब्बल साडेसहा लाखांचा गंडा

संगमेश्वर :
ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून लग्न जुळवण्याच्या नादात संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथील तरुणाला तब्बल ६ लाख ६२ हजार ६१० रुपयांचा गंडा बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाण्यातील एका महिलेविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा शोध सुरू आहे.

३२ वर्षीय नितीन प्रकाश बांबाडे (रा. कळंबस्ते, ता. संगमेश्वर) यांनी ‘मान्यवर मॅट्रिमोनियल’ या वेबसाइटवर आपला बायोडाटा अपलोड केला होता. त्यानंतर त्यांची ओळख ठाण्यातील प्रियंका विनोद लोणारे हिच्याशी करून देण्यात आली. बायोडाटा पाहून संवाद वाढला आणि लग्नाचे आमिष दाखवून प्रियंकाने वेळोवेळी पैशांची मागणी सुरू केली.

तिने अपेंडिक्स ऑपरेशन, एम्ब्रॉयडरी मशीन खरेदी, किरकोळ खर्च या कारणांसाठी पैसे मागितले. नितीन यांनी विश्वास ठेवून तिच्या फोन नंबरशी संलग्न असलेल्या जी-पे व फोन-पे खात्यांवरून अनुक्रमे ३ लाख १३ हजार ६१० रुपये आणि ३ लाख ४९ हजार रुपये असे एकूण ६.६२ लाख रुपये पाठवले.

परंतु एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतरही प्रियंकाने ती परत केली नाही किंवा लग्नाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ सुरू झाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नितीन यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार ही फसवणूक ०६ मार्च २०२५ ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान झाली आहे. संगमेश्वर पोलीस प्रकरणाचा तपास करत असून महिलेचा शोध सुरू आहे.

🔖 हॅशटॅग्स :

#संगमेश्वर #फसवणूक #मॅट्रिमोनियलगंडा #ऑनलाइनगुन्हा #RatnagiriNews #BreakingNews

📸 फोटो

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात