लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती: एक महान स्वातंत्र्यसेनानीला विनम्र अभिवादन
रत्नागिरी: 23 जुलै हा दिवस भारताच्या इतिहासात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या त्यांच्या मूळ गावी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला.
लोकमान्य टिळक हे असे महान स्वातंत्र्यसेनानी होते, ज्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ अशी सिंहगर्जना करत ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवली. ब्रिटिश सत्तेला त्यांनी कडवा विरोध केला, ज्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला आणि त्यांच्यावर राजद्रोहाचे खटलेही चालवले गेले. 1897-98 दरम्यान त्यांना 18 महिन्यांचा तुरुंगवास झाला. त्यानंतर, 1908 ते 1914 या काळात त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले, जिथे त्यांनी तब्बल सहा वर्षे काढली. याच बंदिवासात त्यांनी ‘गीतारहस्य’ या महान ग्रंथाची रचना केली.
लोकमान्य टिळकांचे विचार आजही सामाजिक एकतेसाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांचे काही प्रेरणादायी विचार आपण पुन्हा एकदा स्मरणात आणूया:
* “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.”
* “धर्म आणि व्यवहारिक जीवन वेगळे नाहीत. संन्यास घेणे म्हणजे जीवनाचा परित्याग नव्हे. खरी भावना ही अशी असावी की, केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशाला आपले कुटुंब मानून एकत्रित काम करावे.”
* “प्रगती ही स्वातंत्र्यात अंतर्भूत असते. स्वशासनाशिवाय ना औद्योगिक विकास शक्य आहे, ना राष्ट्रासाठी शैक्षणिक योजना उपयुक्त ठरतील. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हे सामाजिक सुधारणांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.”
* “हे खरे आहे की पावसाच्या अभावामुळे दुष्काळ पडतो. पण हेही तितकेच खरे आहे की, भारतातील लोकांमध्ये या संकटाचा सामना करण्यासाठी ताकद नाही.”
* “जर देव अस्पृश्यता मान्य करत असेल, तर मी त्याला देव मानणार नाही.”
लोकमान्य टिळकांनी आपल्या विचारांनी आणि कृतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक नवा अध्याय लिहिला. त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देत राहतील.
#LokmanyaTilakJayanti#BalGangadharTilak#SwatantraHaMazhaJanmasiddhaHakkaAahe #FreedomFighter#IndianHistory#MandaleJail#GeetaRahasya #स्वराज्यहामाझाजन्मसिद्धहक्कआहे #लोकमान्यटिळक#तिळकजयंती