मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे शैक्षणिक उपक्रम: ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना वह्या वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे शैक्षणिक उपक्रम: ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

Nilesh surve
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे शैक्षणिक उपक्रम: ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना वह्या वाटप

 

गुहागर, [२३ जुलै, २०२५]: महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी एक स्तुत्य शैक्षणिक उपक्रम राबवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोणतीही जाहिरात किंवा प्रसिद्धीपर कार्यक्रम न करता, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याच्या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, निलेश सुर्वे यांनी पडवे आणि काताळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी साजरा होतो. याच दिवशी निलेश सुर्वे यांनी जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नं १, तवसाळ अंगणवाडी, तांबडवाडी शाळा, बाबरवाडी शाळा, माध्यमिक विद्यालय पडवे, पडवे मराठी शाळा, काताळे शाळा नं.१, काताळे नवानगर शाळा, काताळे नवानगर उर्दू शाळा, आणि केंद्रीय शाळा पडवे उर्दू या नऊ शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.

या उपक्रमावेळी काताळे ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रियांका निलेश सुर्वे, पडवे ग्रामपंचायत सरपंच मुजीफ जांभारकर, तवसाळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश गडदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष विनायक सुर्वे, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश सुर्वे, पडवेचे विनायक भोसले, काताळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर अजगोलकर, जैद भाटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य लैबर जांभारकर, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया सुर्वे, मदतनीस श्रीमती मनीषा मयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी विविध शाळांमधील शिक्षकवृंदही उपस्थित होते. यामध्ये जि. प. आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे राठोड सर, काताळे शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका माधवी पाटील मॅडम, कांबळे सर, नवानगरचे गुरसुळे सर, पडवे शाळेचे पावरी सर, संजय राठोड सर, तवसाळ बाबरवाडी शाळेचे कोकाटे सर, तवसाळ तांबडवाडी शाळेचे संदीप भोई सर, साईनाथ पुजारा सर, पडवे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी. सूर्यवंशी, सहशिक्षक पी.जी. वेलुंडे, एस.एम. सूर्यवंशी, लिपिक राहुल कांबळे, प्रशांत सुर्वे, काताळे नवानगर उर्दूच्या मुख्याध्यापिका शाहीन मॅडम, उपशिक्षिका उजवा मॅडम, पडवे उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख परवेज अ. रशिद चिपळूणकर, मुख्याध्यापक महमद सलीम अजगर कारभारी, सहशिक्षक रमजान फुरकान जांभारकर, दाऊद साहेब हमीद जांभारकर, शिक्षण सेविका जुलेखा इरफान हातवडकर, रुखसार या. गनी मेमन आदींचा समावेश होता.

या शैक्षणिक उपक्रमासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्मा. निरंजनजी डावखरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. काताळे आणि पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांना एकाच दिवशी शालेय उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम पहिल्यांदाच राबवला गेला असून, यासाठी निलेश सुर्वे यांचे सर्व शिक्षकवृंद आणि दोन्ही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांकडून कौतुक आणि आभार व्यक्त करण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम करत असताना आपल्या परिसरात अनेक विषयांसाठी निधी खर्च करणाऱ्या निलेश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या या शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

 

 

#DevendraFadnavisBirthday #EducationalInitiative #NileshSurve #SchoolSupplies #MaharashtraPolitics #CommunityService #BJP #GuhagarNews #रत्नागिरी #शैक्षणिकउपक्रम #विद्यार्थ्यांनामदत

#भाजप

Reporters
Author: Reporters

Guhagar Office * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...