रत्नागिरी जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत खदिजा व खातून विद्यालयाची चमकदार कामगिरी
गोवळकोटच्या खेळाडूंचे विभागीय स्पर्धेसाठी निवड
चिपळूण (वार्ताहर): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय शासकीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०२५-२६ नुकत्याच डेरवण येथील एस.व्ही.जे.सी.टी. क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडल्या. २२ जुलै २०२५ रोजी झालेल्या या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सचिन मांडवकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या.
या स्पर्धेत देवरुख, रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांमधून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल आणि खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोटच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. १७ वर्षांखालील मुलांच्या आर्टिस्टिक प्रकारात कु. अली अब्दुल कादिर परकार याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. जियाद आसिफ पटेल याने तृतीय क्रमांक मिळवला.
या दोन्ही गुणवान विद्यार्थ्यांची आता शासकीय शालेय विभागीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना प्रशाळेचे क्रीडाशिक्षक विनोद राऊत सर आणि मुख्याध्यापक इरफान शेख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. इसाक खतीब सर, व्हाईस चेअरमन जफर कटमाले सर, सेक्रेटरी मुजाईद मेयर सर, संस्थेच्या सीईओ उरुसा खतीब मॅडम, तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
बातमी~ योगेश पेढांबकर प्रतिनिधि
#Tags:
#जिम्नॅस्टिक्सस्पर्धा #रत्नागिरी #शालेयखेळ #खदिजास्कूल #खातूनअब्दुल्लाहस्कूल #क्रीडा #चिपळूण #महाराष्ट्राक्रीडा #गोवळकोट #जिम्नॅ
स्टिक्स