महाराष्ट्र’ की ‘बिहाराष्ट्र’ सामाजिक कार्यकर्ता गणेश कदम यांचा राज्य सरकारला टोला
आबलोली (संदेश कदम)
दिवसेंदिवस राज्यात वाढती गुन्हेगारी आणि अत्याचाराचे प्रकार पाहता डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी म’हाराष्ट्र मधील ‘म’ हे अध्याक्षर खोडून बि’हाराष्ट्र असा उल्लेख केलेल्या फोटोवर “कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..!” असं कॅप्शन देऊन सरकारला एका शब्दात उपरोधित टोला लगावून प्रश्न विचारला आहे.
विधानभवनात दोन गटात झालेली हाणामारी असो’ किंवा ‘आमदार निवास कँटिंगमधील कर्मचाऱ्याला आमदारानेच केलेली मारहाण असो’ लोकप्रतिनिधी यांच्याकडूनच जर कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकरून काय अपेक्षा करावी असा प्रश्न गणेश कदम यांनी उपस्थित केला आहे.
कल्याण मधील महिला रिसेप्शनिस्ट वरील गंभीर हल्ल्याबाबत व्यक्त होताना, कायद्याचा धाक राहिला नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.