गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी .

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी

नवी मुंबई (मंगेश जाधव)

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती नुकताच बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र . ४३४ मुंबई, भिमाई महिला मंडळ आणि धम्म दिप तरुण मंडळ यांच्या विद्यमाने आंध्र प्रजा संघ हॉल न्यू हनुमान नगर रहिवाशी संघ गोरेगाव (प.) येथे साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या सुरवातीला बौध्दचार्य गणेश सकपाळ यांनी यांनी धम्म वंदना, त्रिशरण गाथा घेतली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई, माता सावित्रीमाई फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले.

यावेळी विचार मंचावर शाखेचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, पत्रकार मेघना सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिनेश लोखंडे यांनी भूषविले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून फुले-शाहू- आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या तसेच समता सैनिक दलाच्या सैनिक शोभा साळवे यांनी माता रमाई आणि माता सावित्रीमाई फुले यांचा जीवन प्रवास आपल्या भाषणातून सांगितला.त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी देखिल माता रमाई आणि माता सावित्रीमाई यांच्याबद्दल आपले विचार मांडले.

यावेळी शाखेतील अनिल हळदे, रविंद्र गमरे, चंद्रमणी मोहिते, चंद्रकांत गायकवाड, मंगेश जाधव तसेच महिला मंडळातील संगिता धोत्रे , भक्ती जाधव , मानिषा लोखंडे , रोशनी गमरे ,सुप्रिया कदम , पद्ममीनी सुर्यवंशी, वंदना गायकवाड ,पौर्णिमा सदाम्हस्के आणि शाखेतील सभासद, पदाधिकारी सल्लागा व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे कार्यकर्ते आणि भिमाई महिला मंडळाच्या कार्यकारणी यांनी मेहनत घेतली. शेवटी सर्वांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]