तळवली वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ मारण्याची धमकी ;

तळवली वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ मारण्याची धमकी ;

 

आरोग्य सहाय्यक कर्मचाऱ्याची अरेरावी ; प्रकरण मिटविण्यासाठी धडपड

नवी मुंबई (प्रतिनिधी )

तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र तळवलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.पी.कांबळे यांना येथील रुग्णालयामध्ये आरोग्य सहाय्यक पदावर कार्यरत असलेले नथुराम जानवळकर यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. यानंतर येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तसेच डॉक्टर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले समजल्यावर हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून काही लोकांना हाताशी धरून मिटविण्यासाठी धडपड सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 12/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. पी. पी.कांबळे हे आरोग्य केंद्रामध्ये बाह्यरुग्ण तपासणीकरीता कार्यरत होते. या केंद्राच्या ऑनलाईन रिपोर्टिंग कामामध्ये सुधारणा होत नसल्याने वरिष्ठांकडून डॉक्टरांना वारंवार विचारणा केली जात होती. त्यामुळे डॉक्टरांनी येथील आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सहाय्यक नथुराम जानवळकर यांना सकाळी 9.00 वाजता आरोग्य केंद्रात येण्यासाठी विनंती वजा सूचना केली. परंतु वारंवार सूचना देऊनही ते कधी वेळेत उपस्थित राहत नाहीत. त्या दिवशीही ते सकाळी 11.00 वाजता आले. याबाबत डॉक्टरांनी विचारले की, तुम्हाला 9 वाजता यायला सांगितलं होतं तरीहि तुम्ही उशिरा आलात. याचा राग धरून जानवळकर यांनी डॉक्टरांजवळ अरेरावी करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या रुग्णांचेही भान न ठेवता जानवळकर या कर्मचाऱ्याने डॉक्टरांना एकेरी भाषेमध्ये तू क्लास वन ऑफिसर आहेस का?, तुझी केबिन कोणती आहे? अशा भाषेत जोरजोरात बोलण्यास सुरूवात केली. यावर डॉक्टरांनी सांगितले की, ओरडू नका आत केबिनमध्ये बोलूया. यावर जानवळकर यांनी केबिन मध्ये जाऊन आतून कडी लावून दरवाजा बंद करून घेतला व डॉक्टरांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ केली, माझ्या नादाला लागू नकोस, माझ्या नादाला लागेल त्याला जीवंत सोडत नाही अशाप्रकारे वक्तव्य करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळं डॉक्टर देखिल घाबरले व कसे बसे केबिनच्या बाहेर पडले. हा सर्व प्रकार येथील उपस्थित असलेल्या रुग्णांनी पाहिला तर काहींनी या कर्मचाऱ्याला डॉक्टरांजवळ केलेल्या वर्तनाबद्दल खडे बोल सुनावले. मात्र त्याचा या कर्मचाऱ्यावर काहीच परिणाम झाला नाही. या कर्मचाऱ्याने सर्व रुग्णांसमोर डॉक्टरांना लाजीरवाणा व अपमानास्पद वाटेल असा प्रकार केला. असे कर्मचारी जर एखाद्या रुग्णालयामध्ये असतील तर त्या रुग्णालयमध्ये हे कशाप्रकारे सेवा देत असतील. जर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ अशाप्रकारे बोलत असतील तर तेथे गेलेल्या सर्वसामान्य लोकांचं काय? हा प्रश्र्न निर्माण होतो.

हा प्रकार घडल्यानंतर डॉक्टरांनी आपल्या वरिष्ठांना कल्पना देऊन पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनीही तक्रार दाखल करुन घेतली नाही. नथुराम जानवळकर हा कर्मचारी स्थानिक गुहागर तालुक्यातील असल्याने त्याने काही लोकांना, अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वी आशासेविकांनी मला भाऊ म्हणायचं नाही, सर म्हणा अशाप्रकारे दम देवून अपमानास्पद बोलत असल्याचीही तक्रार एका आशासेविकेने वरिष्ठांकडे केलेली होती. एकंदरीत या कर्मचाऱ्याचे अशाच प्रकारे वर्तन असल्याचे अनेकांकडून बोलले जाते.

चांगल्याप्रकारे काम करत असताना देखील एखादा कर्मचारी एका अधिकाऱ्याला अशाप्रकारे अरेरावी करून शिवीगाळ देवून सर्वांच्या समक्ष अपमानास्पद बोलत असेल, आपल्या अधिकाऱ्याचे न ऐकता दादागिरी करून कामचुकारपणा करत असेल तर येथे असणारे वा येणारे वैद्यकीय अधिकारी योग्य सेवा देवू शकत नाहीत. यामुळे या झालेल्या प्रकाराची दखल रुग्णकल्याण समिती सदस्य, तळवली सरपंच, उपसरपंच तसेच तंटामुक्त समितीने घेतली असून गावातील ग्रामस्थ डॉक्टरांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आहेत. असे वर्तन कुठल्या कर्मचाऱ्याचे खपवून घेतले जाणार नाही, त्या कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.

तळवली वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ मारण्याची धमकी ;

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें