१९ रोजी शिवराय मावळे प्रतिष्ठान आबलोली यांचे वतीने “शिवजन्मोत्सव २०२५” चे आयोजन

१९ रोजी शिवराय मावळे प्रतिष्ठान आबलोली यांचे वतीने “शिवजन्मोत्सव २०२५” चे आयोजन

 

शिव पुतळ्याची मिरवणूक (बाईक रॅली) तसेच छावा चित्रपटातील बाळ संभाजी सचिन साळुंखे याची प्रमुख उपस्थिती आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) 

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फुर्तीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे, महाराजांना मानाचा मुजरा गुहागर तालुक्यातील आबलोली येथील शिवराय मावळे प्रतिष्ठान आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी “शिवजन्मोत्सव २०२५”चे आयोजन करण्यात आले असून शिवपुतळ्याची मिरवणूक (बाईक रॅली)तसेच छावा चित्रपटातील बाळ संभाजी महाराजांची भुमिका साकारणारा कलाकार सचिन साळुंखे याची याची प्रमुख उपस्थिती लाभणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

शिव जयंती सोहळा ” शिवजन्मोत्सव २०२५” बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता श्रीमंतयोगी शिवरायांची प्रतिमा पुजन त्यानंतर सकाळी ९:३० ते सकाळी ११:०० यावेळात आबलोली गावातून शिवपुतळ्याची मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी ४:०० ते रात्रौ ८:०० यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर, देशभक्तीपर, पारंपरिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान १) प्राथमिक शाळा लहान गट १ ली ते ४ थी, २) माध्यमिक विद्यालय मोठा गट ५ वी ते १० वी, ३) खुला गट वयाचे बंधन नाही तसेच रात्री ८:०० वाजता मनोगत आणि रात्री ८:३० वाजता बक्षिस वितरण यामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ असा संयुक्त कार्यक्रम (जुने देवघर मैदान) श्री. विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ व महिला मंडळ आबलोली पांचाळवाडी येथे हा संपूर्ण “शिवजन्मोत्सव २०२५” संपन्न होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन शिवराय मावळे प्रतिष्ठान आबलोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें