चिपळुणात जमीन खरेदीत १५ लाखांची फसवणूक; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

चिपळुणात जमीन खरेदीत १५ लाखांची फसवणूक; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

 

चिपळूण, २० मार्च (२४ न्यूज) – चिपळूण तालुक्यातील चिंचघरी येथे जमीन खरेदीच्या व्यवहारात १४ लाख ८२ हजार ३०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने पैसे दिल्यानंतरही जमीन त्याच्या नावावर करण्यात आली नाही, तसेच पैसे परत मागितल्यास धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबतची तक्रार विजय वसंत पाथरवट (३४) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी २० सप्टेंबर २०२२ पासून आतापर्यंतच्या कालावधीत पंकज रजनीकांत खेडेकर (४१) यांना जमीन गट नंबर ४५१ आणि ग्रामपंचायत घर नंबर ६४० खरेदी करण्यासाठी १४ लाख ८२ हजार ३०० रुपये रोख, चेक आणि फोन-पेच्या माध्यमातून दिले होते. या व्यवहाराची माहिती पंकज खेडेकर यांचा भाऊ प्रीतम रजनीकांत खेडेकर (३८) यालाही होती. तसेच, या व्यवहारासाठी करारपत्रही करण्यात आले होते.

 

मात्र, ठरल्याप्रमाणे पंकज खेडेकर यांनी पुढील प्रक्रिया न करता जमीन हस्तांतरण थांबवले. पैसे परत मागितल्यावर दोन्ही भावांनी पाथरवट यांना धमकी दिली, असा आरोप आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिस अधिक तपास करत असून या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें