ग्रामीण भागातील मुलांना झी मराठी आणि श्रेयस तळपदे यांचे व्यासपीठ उपलब्ध – ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांनी पत्रकारांना दिली माहिती

ग्रामीण भागातील मुलांना झी मराठी आणि श्रेयस तळपदे यांचे व्यासपीठ उपलब्ध – ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांनी पत्रकारांना दिली माहिती

चल भावा सिटीत..!”हा कार्यक्रम आवर्जून पहा – रिॲलिटी शो चे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांचे आवाहन.!

आबलोली (संदेश कदम) 

आज आंम्ही गुहागर तालुक्यातील आबलोली गावात यासाठी आलोय की, १५ मार्च २०२५ पासून झी मराठी वर “चल भावा सिटीत..!” हा श्रेयस तळपदे यांचा जो रिॲलिटी शो सुरु झालाय त्याच्या प्रमोशनसाठी तो जास्तीत जास्त लोकांनी कसा बघावा आणि का बघावा तर ग्रामीण भागातील जी सर्व सामान्य मुलं आहेत त्या सर्व सामान्य ग्रामीण भागातील मुलांना झी मराठी आणि श्रेयस तळपदे यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे काम केले आहे त्यामुळे “चल भावा सिटीत..!”हा कार्यक्रम झी मराठी वर प्रत्येकाने पहावा असे जाहीर आवाहन आबलोली येथील पत्रकारांशी बोलताना झी मराठी रिॲलिटी शो चे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांनी केले आहे

गुहागर तालुक्यातील आबलोली कोष्टेवाडी येथील श्री. मधुकर रेपाळ यांच्या घरा समोरील पटांगणात मराठी नविन वर्षाचे औचित्य साधून खास महिलांसाठी “खेळ मनोरंजनाचा..!”, ” खेळातून बक्षीसे जिंकण्याचा..!”, आता कस वाटतयं, सिटीत नाव गाजतयं “, ” आता कस वाटतयं सिटीत आबलोली गाव गाजतयं “, “चल भावा सिटीत..!” हा झी मराठीचा नवीन रिॲलिटी शो नुकताच आबलोली गावात उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला त्यानंतर या रिॲलिटी शो चे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला

यावेळी पत्रकारांशी बोलताना झी मराठीच्या रिॲलिटी शो चे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर पुढे म्हणाले की, दिनांक १५ मार्च २०२५ पासून दररोज रात्री ९:३० वाजता फक्त आणि फक्त झी मराठी वर हा कार्यक्रम तुंम्ही बघू शकता तर माझी तुंम्हा सर्वांना विनंती आहे की, झी मराठी वर दररोज रात्री ९:३० वाजता “चल भावा सिटीत!” हा कार्यक्रम बघायला विसरु नका हा कार्यक्रम आवर्जून बघा अशी विनंती ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर केली

ते पुढे म्हणाले की, गुहागर तालुक्यातील आबलोली गावात आम्हांला यायला उशीर झाला त्याचे कारण प्रवासात आम्हांला खूप अडचणी आल्या त्यामुळे कार्यक्रम चालू व्हायला खूप उशीर झाला पण कार्यक्रमासाठी बहूसंख्येने महिलांची उपस्थिती बघून आमचा सर्व कंटाळा दूर झाला. आपल्या उपस्थिती बद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. कारण आंम्ही ५-५ ते ६-६ तास प्रवास करतो कधी कधी रात्री आंम्हाला झोप सुद्धा मिळत नाही आणि सकाळी त्याच एनर्जीने आंम्हाला कार्यक्रमासाठी ऊभे रहावे लागते इव्हेंड ॲरेंज करावा लागतो पण उपस्थिती बघून आमचा थकवा गायब होतो आमच्या अंगात नवीन जोश संचारतो अशी माहिती झी मराठीच्या रिॲलिटी शो चे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी व्यासपीठावर विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रेडेकर, उपाध्यक्ष अजित रेपाळ, पत्रकार संदेश कदम आदी. उपस्थित होते

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें