आजाद मैदानावर न्याय मिळेना उपोषणाचा तिसरा दिवस

आजाद मैदानावर न्याय मिळेना उपोषणाचा तिसरा दिवस

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती उपोषणाच्या मागण्यावर ठाम

मुंबई प्रतिनिधी: निलेश रहाटे

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचारा विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 7 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषणातील प्रमुख मागण्या 1) देवणी तालुक्यातील शासनाचा महसूल बुडवणाऱ्या खडी केंद्रावर कारवाईची मागणी 2) खोपेगाव ता.लातुर येथे कोट्यावधीचे होत असलेल्या अनाधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी 3) औसा येथे इनामी जमिनीची बेकायदेशीर विक्रीकरणाऱ्या वर कारवाईची मागणी 4) देवणी तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे होत असलेले निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी 5) बुलढाणा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी 6) छत्रपती संभाजी नगर येथील ड्रेनेज समस्या व महावितरणच्या गैरकारभारावर कारवाईची मागणी 7) नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बेकायदेशीर ताडीचे दुकान हटवावे 8) उल्हासनगर महानगर पालिकेच्या आयुक्तच्या मनमानी कारभारा विरोधात उपोषण करण्यात आले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे परंतु उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा प्रशासनातील गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत असुन उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून करीत आहेत. सदर प्रकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना असे वाटते की आझाद मैदानावरही न्याय मिळेना.
सदर आमरण उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे उपोषणात महिला प्रदेश सचिव आसिया रिजवी ठाणे, प्रदेश कार्याध्यक्ष माधव मारकवाड नांदेड, सचिन मोरे रत्नागिरी, नीतू बाखिजा ठाणे, तानाजी मोरे, श्रीकांत मोरे, अरुण मोरे, विजय मोरे, राहुल लालवाणी, स्वप्निल मोरे, प्रदीप मोरे, सलमान शेख, बद्रुद्दीन शेख छत्रपती संभाजी नगर, जाकीर बेग बुलढाणा, हकीम सौदागर लातुर, कैलास पाटील रायगड हे उपस्थित होते.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें