चेंबूरमध्ये नवी मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

 ???? चेंबूरमध्ये नवी मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

सायन-पनवेल हायवेवर थरार; दुचाकीस्वार दोघांचा हल्ला, व्यावसायिक जखमी

 

नवी मुंबई | प्रतिनिधी – मंगेश जाधव

चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात बुधवारी रात्री एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली. नवी मुंबईतील पारसिक हिल, बेलापूर येथील सद्रुद्दीन खान (५०) हे आपल्या वाहनाने सायन-पनवेल हायवेवरून पनवेलला जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडल्या.

 

ही घटना रात्री ९.५० वाजता डायमंड गार्डन सिग्नल परिसरात घडली. हल्ल्यात खान जखमी झाले असून त्यांच्यावर झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमी खान यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे

—

 

#गोळीबार #चेंबूरहल्ला #MumbaiCrime #बांधकामव्यावसायिक #SionPanvelHighway #DiamondGarden #BreakingNews #ratnagirivartahar #MaziBatmi

 

 

—

 

अधिक बातम्यांसाठी भेट द्या:

www.ratnagirivartahar.in 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें