बदलापूरमध्ये भीम जयंतीचा जल्लोष; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बदलापूरमध्ये भीम जयंतीचा जल्लोष; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप पनवेलकर संकुलच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन; महिलांचा, लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

 

 

बदलापूर | प्रतिनिधी मंगेश जाधव

डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप पनवेलकर संकुल, बदलापूर यांच्या वतीने १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अत्यंत उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर सुषमाताई तायडे यांच्या सुमधुर आवाजात बुद्धवंदना सादर झाली.

 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आयु. महेश जाधव आणि सौ. प्रतिभाताई जाधव उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

 

लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी आयोजित विविध स्पर्धांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. महापुरुषांच्या जीवनावर आधारित भाषणे, गीत गायन, नृत्य अशा कार्यक्रमांनी वातावरण भारून टाकले.

 

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये संकुलमधील सर्व युवकांचे योगदान उल्लेखनीय राहिले. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

हॅशटॅग्स:

#भीमजयंती२०२५ #बदलापूर #AmbedkarJayanti #BabasahebAmbedkar #PanvelkarSankul #SocialAwareness #CulturalEvent #DalitEmpowerment

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]