बेलापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बेलापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 

सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणं आणि स्नेहभोजनाने वातावरण भारावले

 

बेलापूर (मंगेश जाधव नवी मुंबई) येथील सृष्टी को. हौ. सोसायटी, सेक्टर २९ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळशीराम जाधव होते तर ध्वजारोहण वर्षा गोठणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

कार्यक्रमात शिवसेना नगरसेविका सरोज पाटील आणि शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. लहान मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण सादर करताना उपस्थितांची मने जिंकली. त्यासोबतच रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडला.

 

कार्यक्रमाचे संयोजन व समालोचन प्रदीप शिवगण आणि रुपाली सावंत यांनी केले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किरण सावंत, वैभव गोठणकर, अमोल सुर्वे, शैलेश शिर्के, शरद शेवडे, किशोर गमरे, दर्शनी जाधव, प्रज्ञा शिवगण, सुनिता गमरे, मोहिनी शेवडे, प्रज्वली सुर्वे आणि इतरांनी परिश्रम घेतले.

 

 

#आंबेडकरजयंती #नवीमुंबई #बेलापूर #DrAmbedkar #सांस्कृतिककार्यक्रम #Shivsena #NaviMumbaiEvents

 

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें