निघोज गावात पारंपरिक परंपरा जोपासत हजारो महिला-पुरुषांच्या सहभागात देवीची यात्रा भावपूर्ण वातावरणात साजरी

बगाडगाडा मिरवणूक, अंबील नैवेद्य आणि महाप्रसादाने मळगंगा देवी यात्रा उत्सव उत्साहात सुरू

 

निघोज गावात पारंपरिक परंपरा जोपासत हजारो महिला-पुरुषांच्या सहभागात देवीची यात्रा भावपूर्ण वातावरणात साजरी

 

 

निघोज / नंदकुमार बागडेपाटील

राज्यातील जागृत आणि श्रध्दास्थानी असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सोमवार, दिनांक २१ एप्रिल रोजी पहाटेपासून उत्साहात सुरू झाला. पहाटे चार वाजता गायखे बंधूंनी देवीची महापूजा व अभिषेक केला. हरिभाऊ व सोन्याबापू गायखे यांच्या कुटुंबीयांना गेल्या अनेक पिढ्यांपासून पुजारी म्हणून मान मिळतो.

 

याच दिवशी पहाटे पाच वाजता आणि सायंकाळी सात वाजता संबळ महाआरतीचा मान छबू व दशरथ दणगुले या गोंधळी कुटुंबाकडे होता. ही परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. दुपारी पाच वाजता नवसपूर्ती करणाऱ्या बगाडगाड्यांची मिरवणूक जय मल्हार मंडळाच्या नेतृत्वाखाली निघाली. या मंडळाचे मार्गदर्शन बाबाजी अण्णा लंके, पांडुरंग लंके, किसनराव लंके, आबाजी लंके व विठ्ठलराव लंके यांनी केले.

 

या बगाडगाड्यांमधून नवस केलेल्या महिला देवीकडे नवसपूर्ती करत होत्या. कै. सिताराम दादा लंके यांनी याआधी वर्षानुवर्षे मिरवणुकीचे सारथ्य केले होते. कन्हैया दूध उद्योग समूहाचे शांताराम मामा लंके व मच्छिंद्रशेठ लंके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने प्रगती केली आहे.

 

मिरवणूक मंदिर, मुख्य पेठ, ग्रामपंचायत चौक मार्गे बारवेजवळ येऊन समाप्त झाली. त्यानंतर महिलांनी देवीला अंबील वर्तवून भक्तिभावाने नैवेद्य अर्पण केला. निघोजसह पुणे व अहमदनगर जिल्ह्यांतील हजारो महिला भाविक उपस्थित होत्या.

 

मळगंगा चित्रमंदिर परिसरात भाविकांसाठी लोकसहभागातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यात सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव लंके, विठोबा कवाद, विष्णू लोखंडे, शिवाजीराव लंके यांच्यासह यात्रा समिती, गावकरी आणि मुंबईकर मंडळ यांनी मोलाचे योगदान दिले. निघोजमधील विविध सामाजिक व गणेश मंडळांनी पंगतीचे नियोजन करत महाप्रसाद वाटपासाठी विशेष मेहनत घेतली.

 

हॅशटॅग्स:

#मळगंगादेवी #निघोजयात्रा #बगाडगाडामिरवणूक #देवीअंबील #महाराष्ट्रपरंपरा #लोकपरंपरा #महाप्रसाद #भाविकांचीउसळ

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें