रत्नागिरी जिल्ह्यात चित्रकला स्पर्धेची रंगतदार तयारी!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यात चित्रकला स्पर्धेची रंगतदार तयारी!

 

२८ एप्रिलला ‘ओम साई मित्र मंडळ हॉल’ येथे होणार स्पर्धा; विद्यार्थ्यांसाठी सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि आकर्षक भेटवस्तू

रत्नागिरी | तळवली (मंगेश जाधव)

मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वोकेशनल एज्युकेशन, मुंबई संलग्न, कला संचालनालय (महाराष्ट्र शासन) मान्यता प्राप्त क्रेडार संचलित देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, रत्नागिरी यांच्या सहकार्याने प्रद्योत आर्ट गॅलरी आणि ओम साई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी ओम साई मित्र मंडळ हॉल, साळवी स्टॉप, नाचणे लिंक रोड, रत्नागिरी येथे होणार आहे.

स्पर्धेसाठी दोन वयोगट निश्चित करण्यात आले आहेत – पाचवी ते सातवी आणि खुला गट. स्पर्धेचा वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १२:३०, त्यानंतर जेवणावधी १२:३० ते १:३०, आणि मार्गदर्शन, प्रात्यक्षिक व बक्षीस वितरण दुपारी १:३० ते ३:०० वाजेपर्यंत असे वेळापत्रक आहे.

प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार असून, विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व कॅम्लिनतर्फे आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा:

अवधूत पोटफोडे (कलाशिक्षक): ७७७४८५९२१२

सिद्धांत चव्हाण: ९४२०१७९३५०

मयूरी घाणेकर भाटकर: ७२१८४८८७४४

 

हॅशटॅग्स:

#रत्नागिरी #चित्रकला_स्पर्धा #विद्यार्थी_प्रतिभा #ArtCompetition #DevrukhArtCollege #OmSaiMitraMandal #RatnagiriEvents #CreativeStudents

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]