श्रीरामपूरमध्ये अंध कलाकारांचा भीमगीतेचा सुरेल कार्यक्रम!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीरामपूरमध्ये अंध कलाकारांचा भीमगीतेचा सुरेल कार्यक्रम!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमशक्ती संघटना व माता रमाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन; समाजकार्यकर्त्यांसह मान्यवरांची उपस्थिती

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी – नंदकुमार बगाडेपाटील) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना व माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंध कलाकारांच्या भीमगीतांच्या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन श्रीरामपूर येथे करण्यात आले आहे.

हा विशेष कार्यक्रम २७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार असून, अंध कलाकार आपली स्वरसाधना सादर करणार आहेत.

 

कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यामध्ये नगरसेविका संगीता चंद्रकांत हांडोरे (मुंबई महापालिका), चारूशीला नगरे (माजी नायब तहसीलदार, श्रीरामपूर), प्राचार्य ज्योती हांडोरे (दक्षिण मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा), संपादक विजया बोरसे, सुनील बोलके साहेब, आमदार हेमंत ओगले (श्रीरामपूर विधानसभा), दिपाली ससाणे (उपाध्यक्ष, युवा महिला काँग्रेस), करण ससाणे (माजी उपनगराध्यक्ष, श्रीरामपूर), बाबासाहेब दिघे (माजी जि.प. सदस्य), आणि दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच सारीका प्रेमचंद कुंकलोळ यांचा समावेश आहे.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप मगर (अध्यक्ष, भीमशक्ती संघटना अहमदनगर जिल्हा) असतील.

या उपक्रमामध्ये संपूर्ण अंध विद्यार्थी सहभागी होत असून, त्यांच्या भीमगीतेच्या सादरीकरणातून कार्यक्रमात विशेष आकर्षण राहणार आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील युवक आणि महिला भगिनींनी या प्रेरणादायी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन माता रमाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आबांदास निकाळजे यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत.

 

हॅशटॅग्स:

#भीमगीतकार्यक्रम #डाॅबाबासाहेबआंबेडकर #श्रीरामपूर #अंधकलाकार #भीमशक्तीसंघटना #मातारमाईप्रतिष्ठान #समाजकार्य #AmbedkarJayanti2025

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]