वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

 

खचलेल्या रस्त्यावर डंपरचा पाटा तुटला; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ संतप्त

 

संदेश कदम

गुहागर (संदेश कदम प्रतिनिधी) ….तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर शेतामध्ये पलटी झाला. गुरुवारी सकाळी एमएच-०८ एपी-१२३४ क्रमांकाचा अमोल पाटील यांच्या मालकीचा डंपर, चालक सागर पवार याच्या नियंत्रणात रामपूर क्रशर येथून खडी घेऊन वरवेली बौद्धवाडी येथील रस्ता डांबरीकरणाच्या कामासाठी जात असताना हा अपघात घडला.

 

रस्त्यातील खोल खड्ड्यांमध्ये डंपर आपटल्याने त्याचा पाटा तुटून डंपर रस्त्यालगत असलेल्या शेतामध्ये उलटला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या ठिकाणी खड्डे व खचलेला रस्ता असल्यामुळे यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

 

ग्रामस्थांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्षच झाल्याची तक्रार व्यक्त केली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा संरक्षणासाठी रेलिंग अथवा भिंतीची आवश्यकता असून त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

हॅशटॅग्स:

#गुहागर #डंपरअपघात #वरवेलीफाटा #PublicWor

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें