गँस दरवाढीचा धोका? फक्त १६ दिवसांचा साठा; इराण-इस्रायल संघर्षाचा भारतात परिणाम!

 

????गँस दरवाढीचा धोका? फक्त १६ दिवसांचा साठा; इराण-इस्रायल संघर्षाचा भारतात परिणाम!

एलपीजीच्या दरात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता; आयातीतून होणाऱ्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार!

नवी दिल्ली (सोशल मिडिया सोर्स) 
इराण आणि इस्रायलमधील युद्धसदृश परिस्थितीमुळे जगभरातील ऊर्जा बाजार动्र अस्वस्थ झाला आहे. या घडामोडींचा थेट परिणाम भारतातील घराघरांतील स्वयंपाकघरांवर होण्याची शक्यता आहे. सध्या देशात केवळ १६ दिवस पुरेल इतकाच एलपीजी साठा शिल्लक असून येत्या काळात गॅस सिलिंडरच्या किमती वाढू शकतात.

अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रांवर केलेल्या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील तेल व गॅस पुरवठ्यावर गडद सावट आहे. विशेष म्हणजे, भारत आपल्या एलपीजी गरजांपैकी तब्बल ६६% आयात करतो, त्यातील ९५% पुरवठा सौदी अरेबिया, यूएई आणि कतारमधून होतो. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम करू शकतो.

याउलट, पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत भारत अधिक सुरक्षित स्थितीत आहे. देश पेट्रोल आणि डिझेलचा निव्वळ निर्यातदार असून गरज पडल्यास निर्यात थांबवून देशांतर्गत गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. मात्र एलपीजीची परिस्थिती वेगळी आहे, कारण यावर देशातील ३३ कोटी कुटुंबांचे अवलंबित्व आहे.

विशेष म्हणजे, भारतीय रिफायनरीज, आयात टर्मिनल्स आणि बॉटलिंग युनिट्समध्ये एलपीजीचा साठा केवळ १६ दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि औद्योगिक क्षेत्राने सावध भूमिका घेतली आहे, मात्र नागरिकांनी घाबरून खरेदी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


????#गँसदरवाढ #एलपीजीसंकट #इराणइस्रायलयुद्ध #भारतऊर्जासंकट #BreakingNews #GasPriceHike #MiddleEastTension


???? फोटो

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें