रत्नागिरीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या बहाण्याने तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक

???? रत्नागिरीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या बहाण्याने तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक

टेलिग्रामद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून संशयिताकडून विश्वास संपादन, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रत्नागिरी : ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एका तरुणाची तब्बल साडेपाच लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी, 14 जून ते मंगळवारी, 17 जून 2025 या कालावधीत धनजी नाका परिसरात घडलेल्या या घटनेत संशयित जी. श्री. किशना याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 318(4) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66(ड) नुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी एजाज सुभेदार (28, रा. आंबेडकर रोड, रत्नागिरी) यांचा टेलिग्राम अ‍ॅपवरून संशयिताशी संपर्क झाला होता. सुरुवातीला गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला आणि त्यानंतर त्यांनी एकूण 5 लाख 33 हजार रुपये संशयिताच्या बँक खात्यात व युपीआय आयडीद्वारे हस्तांतरित केले. मात्र, नफा व गुंतवणूक परत करण्यास टाळाटाळ केल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तपास सुरू केला असून नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

#CyberCrime #OnlineScam #RatnagiriNews #InvestSmart #PoliceCase #StaySafe

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें