अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं!

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं!

प्रवीण गायकवाड Blaked in Akkalkot: Sambhaji Brigade Chief Targeted by Shivdharma Foundation

सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं. त्यांच्या अंगावर काळी शाई टाकण्यात आली. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमासाठी आले असताना शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाले होते. त्यांनी यावर नाराजीही व्यक्त केली होती. त्याचबरोबर त्यांनी स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा रागही पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. त्यामुळे, गायकवाड शहरात आल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणही केले होते.

प्रवीण गायकवाड यांचे हलगीच्या गजरात स्वागत करून संयोजक त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जात असताना, शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेतच अडवले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर काळी शाई ओतली आणि तोंडालाही काळे फासले. यावेळी प्रवीण गायकवाड यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’ आणि ‘श्री स्वामी समर्थ’ असा जयजयकार करत पदाधिकारी व कार्यकर्ते निघून गेले. या घटनेमुळे अक्कलकोटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Hashtags/हॅशटॅग:

* #प्रवीणगायकवाड

* #PraveenGaikwad

* #अक्कलकोट

* #Akkalkot

* #संभाजीब्रिगेड

* #SambhajiBrigade

* #काळेफासले

* #BlackInkAttack

* #शिवधर्मफाउंडेशन

* #ShivdharmaFoundation

* #मराठासमाज

* #MarathaCommunity

* #सोलापूर

* #Solapur

* #BreakingNewsMarathi

* #MaharashtraPolitics

* #स्वामीसमर्थ

* #छत्रपतीसंभा

जीमहाराज

* #Protest

* #ShahiFek

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें