गुरुपौर्णिमा: कामोठे येथे शिक्षक गौरव सोहळा संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुरुपौर्णिमा: कामोठे येथे शिक्षक गौरव सोहळा संपन्न

नवी मुंबईत सुरेश खरात, शुभांगी खरात आणि सुनील कर्पे यांच्या पुढाकाराने शिक्षकांचा सन्मान

नवी मुंबई (मंगेश जाधव, वेळबंकर)

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर कामोठे, नवी मुंबई येथे शिक्षकांच्या सत्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम समाजसेवक श्री. सुरेश शेठ खरात, सौ. शुभांगीताई खरात आणि श्री. अल्पेश जी. माने यांच्या संकल्पनेतून साकारला होता. विशेषतः, श्री. सुनील कर्पे सर यांच्या पुढाकाराने आणि संयोजनाने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पंकज कुमार पाटील सर यांनी केले, तर शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. आर. बी. पाटील सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे शिक्षकांच्या योगदानाला आदराने गौरवण्याची संधी लाभली, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

#गुरुपौर्णिमा #शिक्षकसन्मान #कामोठे #नवीमुंबई #शिक्षकगौरव #मंगेशजाधव #सुरेशखरात #सुनीलकर्पे #आरबीपाटील #शिक्ष

कसेना

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]