सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ उत्साहात साजरा

 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ उत्साहात साजरा

 

शोभिवंत मत्स्यपालन : इंद्रधनु क्रांतीकडे वाटचाल’ या चर्चासत्रात राज्यातील ४० हून अधिक मत्स्य व्यावसायिकांचा सहभाग

प्रतिनिधी | रत्नागिरी वार्ताहर

रत्नागिरी : सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक १० जुलै २०२५ रोजी ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘शोभिवंत मत्स्यपालन : इंद्रधनु क्रांतीकडे वाटचाल’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. केतन चौधरी (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी) व जेष्ठ मत्स्य व्यावसायिक श्री. श्रीराम हातवलने यांच्या हस्ते डॉ. हिरालाल चौधरी आणि डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा व कर्नाटकातून सुमारे ४० हून अधिक शोभिवंत मत्स्य व्यावसायिक उपस्थित होते. डॉ. आसिफ पगारकर यांनी प्रास्ताविक भाषणात केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमात श्री. ऋषिकेश भाटकर (UNDP प्रकल्प समन्वयक) यांनी कांदळवनातील मत्स्यशेती व अनुदान योजनांवर सादरीकरण केले. अनेक सहभागी मत्स्य व्यावसायिकांनी प्रशिक्षणाचा व्यवसायावर झालेला परिणाम सांगितला.

मान्यवर उपस्थिती व सहभाग:

श्री. फहद जमादार, श्री. विस्पी मिस्त्री, श्री. विकास पाटील (बेळगाव), श्री. जावेद म्हेतर (कोल्हापूर), चेतन साळुंके (पुणे), श्री. नितीन बापट (जळगाव), श्री. राजकिरण साटम (मुंबई), श्री. अल्बर्ट अमन्ना (ठाणे), श्री. सुयोग भागवत (रत्नागिरी) यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:

चर्चासत्राच्या समारोपात उपस्थित व्यावसायिकांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी व्यावसायिकांनी एकत्र येऊन सहकाराच्या माध्यमातून व्यवसायवाढ साधण्यावर भर दिला.

सहयोग आणि परिश्रम:

या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. आसिफ पगारकर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, डॉ. हरिष धमगये यांच्यासह अनेकांनी संयोजनात मोलाचा वाटा उचलला.

 

 

 

#राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन

 

#मत्स्य व्यवसाय

 

#शोभिवंत मत्स्यपालन

 

#सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी

 

#मत्स्य प्रशिक्षण महाराष्ट्र

 

#मत्स्यशेती अनुदान योजना

 

#Akshay शेतकरी कार्यक्रम

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें