राजापूर तालुक्यात महिलांचा झेंडा : १०१ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायतींवर महिलाराज

📰  राजापूर तालुक्यात महिलांचा झेंडा : १०१ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायतींवर महिलाराज

 

✍️राजू सागवेकर/ राजापूर

 

राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले असून, यावर्षी महिलांनी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. एकूण १०१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५१ ग्रामपंचायतींवर महिलांना सरपंचपदाचा मान मिळणार असून, ग्रामीण भागात महिलांना मिळणारे हे बळ परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.

 

आरक्षणातून महिलांना दिलासा मिळाल्याने अनेक ठिकाणी महिला उमेदवार आता गावांच्या विकासासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी २ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

 

🔹 मागास प्रवर्गातील महिलांना संधी :

राजापूर तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गातील १४ ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंचपदाची संधी मिळाली आहे. यात आजिवली, दसूर, हसोळ तर्फे सौंदळ, चुनाकोळवण, जैतापूर, तळगाव, आडवली, नाटे, कोतापूर, हातिवले, आंगले, ताम्हाणे, वाटूळ व झर्ये या गावांचा समावेश आहे.

 

🔹 मागास प्रवर्गातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पुरुषांसाठी संधी :

याशिवाय नागरिकांचा मागास प्रवर्गातील १३ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. यात ओशिवळे, उपळे, धाऊलवल्ली, मंदरूळ, डोंगर, वाल्ये, कोंडये तर्फे सौंदळ, येळवण, मोरोशी, पांगरे बु., सोलगाव, साखरी नाटे, सागवे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

 

🔹 सर्वसाधारण महिलांसाठी ३५ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण :

सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सर्वाधिक ३५ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. ओझर, हातदे, जुवाठी, राजवाडी, शेढे, भालावली, हरळ, कोदवली, रायपाटण, तुळसवडे, दळे, करक, मोसम, सौंदळ, वडदहसोळ, देवीहसोळ, कारवली, माडबन, ससाळे, खडी कोळवण, धोपेश्वर, अणसुरे, पाचल, खरवते, खिणगिणी, गोवळ, कशेळी, पांगरे खुर्द, महाळुंगे, कोडये तर्फे राजापूर, गोठणे दोनिवडे, कुवेशी, प्रिंदावण, शिवणे खुर्द, तेरवण या गावांमध्ये आता महिला नेतृत्व दिसणार आहे.

 

🔹 ३६ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवारांना संधी :

आंबोळगड, कोंडसर बुद्रक, परटवली, वडवली, ओणी, मिठगवाणे, पेंडखळे, कणेरी भू, मूर, तळवडे, मोगरे, चिखलगाव, मिळंद, तारळ, काजिर्डा, देवाचे गोठणे, नाणार, वाडापेठ, कोळंब, दोनिवडे, निवेली, विल्ये, साखर, जुवै जैतापूर, पडवे, येरडव, शीळ, जवळेथर, परुळे, फुफेरे, शेजवली, कुंभवडे, पन्हळे तर्फे सौंदळ, उन्हाळे, कोंडीवळे या ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार सरपंच म्हणून निवडून येऊ शकतात.

 

🔸 गावचा चेहरा बदलणार!

तालुक्यातील या आरक्षण योजनेमुळे गावागावात महिलांचे प्रबळ नेतृत्व दिसून येणार आहे. मागील काही वर्षांत महिलांनी पंचायत राज व्यवस्थेत आपले कर्तृत्व सिद्ध केल्याचे उदाहरणे आहेतच. यंदाचे आरक्षण गावच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांना नवीन संधी देणार आहे, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें