गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी घेतली भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भरत शेट्ये यांची सदिच्छा भेट!

गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी घेतली भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भरत शेट्ये यांची सदिच्छा भेट!

मुंबई ~आमदार भास्करशेठ जाधव यांनी गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष आणि त्यांचे जुने सहकारी श्री. भरत शेट्ये यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. श्री. शेट्ये आजारी असल्याची माहिती मिळताच आमदार जाधव यांनी तात्काळ त्यांची भेट घेतली.

भेटीदरम्यान, श्री. शेट्ये यांनी आमदार जाधव यांचा हात प्रेमाने हातात घेतला. त्यांना काहीतरी बोलायचे होते, पण शब्द सुचत नव्हते आणि त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. हे पाहून आमदार जाधवही भावूक झाले. मात्र, श्री. शेट्ये यांच्या कुटुंबीयांनी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितल्यावर जाधव यांना आनंद झाला.

यावेळी आमदार जाधव यांनी श्री. शेट्ये यांना लवकर बरे होऊन गुहागरला परत येण्याचे आवाहन केले. तसेच, कुटुंबाला कोणतीही अडचण आल्यास कधीही संपर्क साधण्याचे आश्वासन दिले.

 

 

#BhaskarShethJadhav #BharatShetye #Guhagar #BhandariSamaj #PoliticalNews #MaharashtraPolitics #GetWellSoon #गुहागर #भास्करशेठजाधव #भरतशेट्ये #भंडारीसमाज #राजकारण #महाराष्ट्र

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें