प्रा. सुनील जोपळे यांची रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘संवाद युनिट’मध्ये समाजसेवक म्हणून नियुक्ती!

प्रा. सुनील जोपळे यांची रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘संवाद युनिट’मध्ये समाजसेवक म्हणून नियुक्ती!

रत्नागिरी: मराठा मंदिर विद्यावर्धिनी स.रा.देसाई डी.एल.एड. कॉलेजचे उपक्रमशील, संवेदनशील आणि उत्तम व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक श्री. सुनील रामा जोपळे यांची नुकतीच रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरण येथे स्थापन करण्यात आलेल्या (SAMVAD Unit) संवाद युनिटमध्ये समाजसेवक म्हणून नियुक्ती झाली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या NALSA (संवाद सीमांत, असुरक्षित आदिवासी आणि विमुक्त/भटक्या जमातींसाठी न्याय मिळवून देण्याच्या सुविधेला बळकटी देणे) योजना २०२५ च्या अंमलबजावणीसाठी प्रा. श्री. सुनील रामा जोपळे (नाचणे, रत्नागिरी) यांची या उद्देशाने स्थापन केलेल्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती मा. अध्यक्ष सुनील एस. गोसावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी आणि मा. आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली आहे.

प्रा. श्री. सुनील रामा जोपळे हे ‘ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल’ (OFROT) या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष असून, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. ते उत्तम व्याख्याते देखील आहेत. ट्रेस मॅनेजमेंट, समुपदेशन, मोटिव्हेशन, करिअर गायडन्स, गोल सेटिंग, ध्येय निश्चिती अशा अनेक विषयांवर ते व्याख्याने देतात. सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी आणि उत्तरदायित्व असलेले प्रा. श्री. सुनील रामा जोपळे हे एक उत्तम माणूस आणि विचारवंत आहेत.

 

 

 

 

#SunilJopale #SAMVADUnit #Ratnagiri #LegalServices #NALSA2025 #SocialWorker #OFROT #ProfessorJopale #समाजसेवक #सुनीलजोपळे #रत्नागिरी #विधीसेवाप्राधिकरण #सामाजिक

कार्य

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें