नारायण गणेश कुलकर्णी सागवे गोठीवरे च्या मुख्याध्यापकांची माहिती देण्यास टाळाटाळ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नारायण गणेश कुलकर्णी सागवे गोठीवरे च्या मुख्याध्यापकांची माहिती देण्यास टाळाटाळ

 

सप्टेंबर २०२४ पासून गैरहजर असताना सुद्धा काढला होता पगार?

 

समिर शिरवडकर-रत्नागिरी

 

राजापूर :- ( सागवे) :-सागवे गोठीवरे ग्राम विकास मंडळ श्री नारायण गणेश कुलकर्णी विध्या निकेतन सागवे या शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशीच मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता,विद्यार्थ्यांनी शी गैरवर्तणुक केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाला शाळेचे मुख्याध्यापक कांबळे यांनी पालक आणि ग्रामस्थांना न जुमानता आपल्या अधिकारात त्या शिक्षकाला शाळेत रुजू केले होत.आणि त्याचा संपूर्ण पगार हजर नसतानाचा दिला गेला आहे असा ग्रामस्थांचा आरोप असुन त्याबद्दल माहिती अधिकारात माहिती मागितली होती.

संमंधीत विषयी दि.२०/६/२५ रोजी शिक्षण विभाग ( माध्यमिक) रत्नागिरी यांना अर्ज सादर केला असून समंधीत विभागाने जण माहिती अधिकारी वरीष्ठ शिक्षक नारायण गणेश कुलकर्णी सागवे ला पत्र क्र.२२१२/२०२५ दि.३०/६/२५ अन्वये माहिती पुरविण्यास आदेशीत केले होते.परंतु, समंधीत विषयीं कोणत्याही तक्रारी आपल्याकडे उपलब्ध नाहीत ,तसेंच मागणी केलेली माहिती वयक्तिक स्वरूपाची असलेने ती त्रयस्थ व्यक्तीला माहिती अधिनियन २००५ कलम ८ ( ग) नुसार देता येत नाही असे खोडसाळ पणे उत्तर दिले आहे.( कायद्यात कलम ८ (१) ग आहे परंतु मुख्यद्यपक सागवे चे पत्र ९६ /२५-२६ दि.१९/७/२५ मध्ये कलम ८ ( ग) असा उल्लेख आहे असे कलम नाही).

माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे मा. शिक्षण अधिकारी ( माध्यमिक विभाग) यांच्याकडे दि.०७/०८/२५ रोजी अपील केले आहे.या अपिलाची सुनावणी कडे लक्ष लागले आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]