पिंपळी नदीवरील पूल खचला; दसपटी विभागाकडे वाहतूक ठप्प

💥 पिंपळी नदीवरील पूल खचला; दसपटी विभागाकडे वाहतूक ठप्प

चिपळूण तालुक्यातील महत्त्वाचा दुवा बंद; नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार

चिपळूण – तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा आणि जिल्हा मार्ग क्र. २३ वरील पिंपळी-नांदिवसे रस्त्यावरील नदीवरील पूल अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.

पिंपळी गाणे-खडपोली एम.आय.डी.सी.ला जोडणाऱ्या या पुलाच्या काही भागात तडे गेल्याचे स्थानिकांनी लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), चिपळूण यांना कळवले. माहिती मिळताच उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली.

वाहतूक बंद झाल्यामुळे दसपटी विभागाकडे जाणाऱ्या प्रवासी व वाहनधारकांना आता पिंपळी–पेढांबे फाटा–खडपोली हा पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले.

या ठिकाणी राजू मेस्त्री, संदेश मोहिते (खेर्डी), विलास मोहिते, मुराद अडरेकर, फिरोज कडवइकर (सरपंच, खडपोली) यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. पुलाच्या खचण्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

 

📌 हॅशटॅग्स

 

#पिंपळीपूल #चिपळूण #दसपटी #रत्नागिरीबातमी #पूलखचला #BreakingNews

 

 

 

📷 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें