निर्मल ग्रामपंचायत पडवेची ग्रामसभा उत्साहात संपन्न

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🏡 निर्मल ग्रामपंचायत पडवेची ग्रामसभा उत्साहात संपन्न

सरपंच मुजीब जांभारकर यांच्या निर्णयाचं ग्रामस्थांनी मानले आभार


गुहागर – (बातमी -सुजित सुर्वे )

(दि. 26) तालुक्यातील पडवे येथील निर्मल ग्रामपंचायतची तहकूब 15 ऑगस्टची ग्रामसभा आज (26 ऑगस्ट) सरपंच मुजीब जांभारकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली.

सभेच्या सुरुवातीला इतिवृत्त आणि जमाखर्चाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेविका सौ. पाटील यांनी पंचायतमधील विविध विकासकामांचा आढावा सादर केला. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरपंच मुजीब जांभारकर यांनी सविस्तर उत्तरे दिली.

दरम्यान, पडवे गावात गणेशोत्सव काळात सौर ऊर्जेवर चालणारे दिवे लावण्याची मागणी तरुण उत्कर्ष मंडळा तर्फे करण्यात आली. ग्रामस्थांच्या या मागणीला सरपंच जांभारकर यांनी तात्काळ मंजुरी देत गावातील नागरिकांना उत्सव काळात अंधाराचा त्रास होऊ नये यासाठी सौर दीप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

या समाजाभिमुख निर्णयाचे ग्रामस्थांनी एकमुखाने स्वागत करत सरपंचांचे आभार मानले.

या सभेला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खातू, शमा मखजनकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गडदे, पोलिस पाटील अनंत गांधी, सुमेध सुर्वे, विलास गडदे, अमानत जांभारकर, विनायक भोसले, पराग कोळवणकर, सचिव नईम मखजनकर, ओंकार गडदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

 


🏷️ हॅशटॅग्स :

#ग्रामसभा #निर्मलग्रामपंचायत #पडवे #गुहागर #सौरऊर्जा #ग्रामविकास #रत्नागिरीवार्ताहर


📸 फोटो 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]