मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

💥 ब्रेकींग अपडेट 💥

मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेलं मराठा बांधवांचं वादळ अखेर मुंबईत दाखल झालं आहे. हजारो वाहनांचा ताफा पहाटेच मुंबईत दाखल झाला असून काही वेळातच जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहचणार आहेत.

या आंदोलनामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्ग तयार केले असून आझाद मैदान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण व सग्यासोयऱ्यांचा जीआर या प्रमुख मागण्यांवर आज सरकारची भूमिका स्पष्ट होणार आहे.

 

 


🔖 हॅशटॅग्स :

#BreakingNews #MarathaReservation #Mumbai #ManojJarange #AzadMaidan #MarathaAndolan

📸 फोटो 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]