मनोज जरांगेंचा मोठा विजय! हैदराबाद गॅझेट लागू; आंदोलकांवरील गुन्हे मागे; सरकारकडून सकारात्मक निर्णय

💥💥 ब्रेकींग बातमी

 

🟣 मनोज जरांगेंचा मोठा विजय! हैदराबाद गॅझेट लागू; आंदोलकांवरील गुन्हे मागे; सरकारकडून सकारात्मक निर्णय

मुंबई– मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर राज्य सरकारच्या उपसमितीने सकारात्मक निर्णय घेतला असून हैदराबाद गॅझेट तात्काळ लागू करण्याचा निर्णय झाला आहे. गाव, नातं, कुळ या आधारे चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मनोज जरांगे यांच्या पाच मागण्यांवर उपसमितीने आठ प्रस्ताव दिले असून त्यावर तातडीने जीआर काढला जाणार असल्याचं आश्वासन समितीने दिलं. मात्र मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी एक-दोन महिने वेळ लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. न्यायालयात जाऊन त्यासंबंधी अर्ज दाखल केला जाणार आहे. आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या तसेच मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व सरकारी नोकरी देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.

मराठा उपसमितीच्या बैठकीत अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते. शिंदे समितीशी झालेल्या चर्चेनंतर हा अंतिम मसुदा तयार करून मनोज जरांगे यांना सादर करण्यात आला.

👉 या निर्णयांमुळे मराठा आंदोलनाला मोठं वळण मिळालं असून, आंदोलकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

 

 

हॅशटॅग्स:

#मनोजजरांगे #मराठाआरक्षण #हैदराबादगॅझेट #कुणबीप्रमाणपत्र #राज्यसरकारनिर्णय #मराठाआंदोलन

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें