कोकणाचा अभिमान! सिंधुदुर्गातील अ‍ॅड. अमित जामसंडेकर यांची थेट न्यायमूर्ती म्हणून निवड; मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ

💥💥 ब्रेकींग बातमी

🟣 कोकणाचा अभिमान! सिंधुदुर्गातील अ‍ॅड. अमित जामसंडेकर यांची थेट न्यायमूर्ती म्हणून निवड; मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ

 

मुंबई– कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र अ‍ॅड. अमित जामसंडेकर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे, वकील म्हणून थेट न्यायमूर्तीपदी पोहोचलेले ते सिंधुदुर्गातील पहिलेच वकील ठरले आहेत.

 

भारताच्या राष्ट्रपतींनी, भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या सल्लामसलत करून ही नियुक्ती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील सर्व खंडपीठांचे न्यायमूर्ती दूरदृष्टी प्रणालीद्वारे या शपथविधीला उपस्थित होते.

 

अ‍ॅड. जामसंडेकर हे बौद्धिक संपदा अधिकार (Intellectual Property Rights) या क्षेत्रातील तज्ज्ञ वकिलांपैकी एक असून, ब्रिटनमध्ये त्यांनी कायदेविषयक शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या 26 वर्षांपासून त्यांनी ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराइट, गोपनीय माहिती, भौगोलिक संकेत यासारख्या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यशस्वीपणे काम केले आहे.

 

कैलासवासी सत्यवान जामसंडेकर यांचे सुपुत्र असलेले अमित जामसंडेकर हे कोकणातून न्यायव्यवस्थेत थेट न्यायमूर्ती म्हणून पोहोचणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कोकणातून आणि कायदे क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

#️⃣ #अमितजामसंडेकर #सिंधुदुर्ग #मुंबईउच्चन्यायालय #कोकणाचाअभिमान #न्यायमूर्ती #BreakingNews

 

📸 फो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें