गुहागरात शिंदे गट आक्रमक; शेकडो आजी-माजी पदाधिकारी धनुष्यबाण हाती घेणार ….

👉 गुहागरात शिंदे गट आक्रमक; शेकडो आजी-माजी पदाधिकारी धनुष्यबाण हाती घेणार ….

👉 महेश नाटेकरांचा दावा – UBT शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात दाखल होणार..

गुहागर (सुजित सुर्वे, पडवे ) ~ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच गुहागर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान शिवसेना (UBT) च्या एकाधिकारशाही कारभारामुळे असंतोष निर्माण झाला असून अनेक पदाधिकारी उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामध्ये शिवसेना (UBT), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

याआधी जि.प. वेळणेश्वर गटात माजी सदस्य नेत्रा ठाकूर आणि महेश नाटेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती, शाखाप्रमुख, विद्यमान सरपंच-उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होणार आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना जि.प.चे माजी सदस्य व माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी सांगितले की, “पक्षप्रवेश सोहळ्यासाठी 2000 हून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असून ही मंडळी थेट प्रवेशकर्तीच असतील. काही विद्यमान आमदारांचे विश्र्वासू सहकारीही यामध्ये आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सर्वजण धनुष्यबाण हातात घेणार आहेत.”

नियोजित कार्यक्रम ४ सप्टेंबर रोजी होणार होता, मात्र मंत्री सामंत यांच्या तांत्रिक अडचणींमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. हा सोहळा पुढील दोन दिवसांत किंवा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पार पडण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेना (शिंदे गट) सज्ज : महेश नाटेकर पुन्हा धनुष्य बाण घेऊन निवडणूक लढवणार.!

नाटेकर पुढे म्हणाले की, “जनतेच्या पाठींब्यावर आम्ही याआधी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जिंकल्या. याही वेळी धनुष्यबाणावर शिवसेना (शिंदे गट) तालुक्यात वर्चस्व प्रस्थापित करेल. पडवे जिल्हा परिषदेचा गट हा शंभर टक्के शिवसेने चाच होईल.”

महेश नाटेकर हे पडवे जि.प. गटाचे माजी उमेदवार व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून ते आगामी निवडणुकीत पुन्हा धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 


🔥 👉 आमची  ही पण बातमी वाचा ⭕

📌 हॅशटॅग्स

#GuhagarPolitics #ShivSenaShindeGroup #UdaySamant #MaheshNatekar #Shivsena #RatnagiriNews #गुहागरराजकारण #पक्षप्रवेश #धनुष्यबाण #रत्नागिरीवार्ताहर

📸 फोटो 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें